सडक अर्जुनी तालुक्यात गांजा विकणाऱ्याश रंगेहाथ अटक, देवरी पोलिसांची धडक कारवाही

सडक अर्जुनी- MKM NEWS 24- सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे पोलिसांनी धडक कारवाही करून २० हजार ४०० रुपये किमतीच्या गांजा सह एकास रंगेहाथ अटक केली.

ही कर्वाहून 18 अक्टोंबर रोजी करण्यात आली असून हिरालाल तुकाराम मेश्राम असे आरोपीचे नाव आहे.
विक्रीच्या अनुसंघाने कोयलारी येथे एका ईस्माकडे गांजाची साठवणूक आहे अशी गुप्त माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथक कोटलारी कडे रवाना करण्यात आला.

या दरम्यान कोयलारी येथील हिरालाल तुकाराम मेश्राम यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच बरोबर घराशेजारीच्या शेतशिवारात शोध मोहीम राबवली असता त्यामध्ये दोन किलो ५४० ग्राम गांजा सापडला . यावरून २० हजार ४०० रुपये किमतीचा गांजा सह आरोपी हिरालाल मेश्राम ला पंचा समक्ष अटक करण्यात आली. आरोपी विरूद्ध देवरी पोलीस स्टेशन मध्ये कलम २०(२) (बी), २१(बी) ,२२(बी) , एन डी पी एस कायदा १८८५ भादवी अनांव्ये गुन्हा नोंद आला असून ही कारवाही सपोणी अजित कदम, देवरीचे सपोनि विजय धुमाळ, पोहवा कंगाली , राऊत, देसाई, बोपचे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *